आठवलेंच्या RPI चा नागालँडमध्ये झेंडा; विधानसभेच्या 2 जागा जिंकल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून यामधील नागालँड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने विजयी झेंडा फडकावला आहे. नागालँड मध्ये आरपीआयचे 2 आमदार विजयी झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर प्रथमच रामदास आठवले यांचा आमदार निवडून आला आहे.

RPI (आठवले गट) च्या Y. लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन या मतदारसंघात विजय मिळवला आहे तर इम्तीचोबा ( Imtichoba ) यांनी तुएनसांग सदर-II ( Tuensang Sadar-II seat ) ही जागा जिंकली आहे. या २ जागा जिंकल्यामुळे रामदास आठवले यांच्या आरपीआयचे ताकद महाराष्ट्राबाहेर थोड्याफार प्रमाणात वाढली आहे असंच म्हणावं लागेल.

नागालँड मध्ये विधानसभेच्या ६० जागा असून बहुमतासाठी ३१ जागांची आवश्यकता आहे. याठिकाणी भाजप – NDPP युतीला अच्छे दिन पहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत आलेल्या ताज्या आकडेवाडीनुसार, भाजप NDPP युती ३६ जागांवर आघाडीवर आहे. राष्टवादी काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर असून त्यांच्याही २ जागा विजयी झाल्या आहेत. एकूण आकडेवारी पाहता भाजप NDPP युती सहज सत्तास्थापन करू शकते.