ना मंगळसूत्र,ना सिंदूर; लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर पडली नववधू अथिया

0
166
Athiya Shetty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिने नुकतेच भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर आता ती बाहेर पडली. परंतु तिने ना सिंदूर लावलं ना मंगळसूत्र घातले होते. हे पाहून नेटकऱ्यांनी आता तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. अथियाचा व्हिडीओ सध्या प्रचंड सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/Cn9cRxPjbJN/?utm_source=ig_web_copy_link

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अथिया लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसून आली. यावेळी तिने ना लग्नातील मंगळसूत्र घातले होते ना कपाळावर सिंदूर लावले होते. तिचा हा व्हिडीओ प्रसिद्ध पापाराझी विरल भयानी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/Cnwxi1EDP4U/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओत अथिया जीन्स आणि टी शर्टमध्ये दिसून येत आहे. पापाराझी अभिनेत्रीला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. अभिनेत्रीनेसुद्धा त्यांना हास्य करत धन्यवाद दिले आहे. परंतु आपल्या लुकवरून अथिया ट्रोल होत आहे.