नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
पेठ शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. पेठ शहरात दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी. आय.डी.बीआय.बँकेचे ए.टी.एम.मध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून एटीएम मशिन हातोडी व स्क्रुड्रायव्हरने फोडुन रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता.
सदर घटनेबाबत आय.डी.बी.आय. बँक पेठ शाखेचे मॅनेजर श्रीकिरण नंदकिशोर विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेची पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची बैठक घेऊन बैठकीत गुन्हाची उकल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आरोपींचा समांतर तपास सुरू होता. एमटीएम फोडणारे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यांचे वर्णन व पेहरावावरून स्थानिक गुन्हे शाखाचे पथक आणि पेठ पोलिसांनी नाशिक शहरात शोध सुरु केला.दरम्यान, खबऱ्यामार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक संशयित नासर्डी पुल परिसरात असल्याचे समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक व पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून संशयित राजेश बाळु खाणे, वय 28, रा.आंबेडकरवाडी, नासर्डीपुल, नाशिक यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याचा साथीदार अंबादास पवार उर्फ बंद-या यास बोधलेनगर परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पेठ येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अंबादास पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो गजाआड झाल्यामुळे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पेठ पोलीस ठाण्याचे पोनि रामेश्वर गाडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक संदिप कहाळे, पोलीस उपनिरीक्षक रामभाउ मुंढे,
पोलीस हवालदार हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, वसंत खांडवी, जे.के.सुर्यवंशी, भूषण रानडे, पोकॉ प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, संदिप लगड, तसेच पेठ पोलीस ठाण्याचे सपोउनि भाउसाहेब उगले, पोना दिलीप रहिरे, पोका विजय भोये यांचे पथकाने नाशिक शहरातुन वरील आरोपीना ताब्यात घेवुन एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.