हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती सामन्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत आहे. एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता सर चार्ज लागणार नाही आहे. त्याचबरोबर बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अटही शिथिल करण्याची घोषणा सुद्धा अर्थमंत्रालयाने केली आहे. खात्यात कमी रक्कम असल्यास आता बँक शुल्क आकारणार नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही निर्णयांचा पुढील ३ महिने सामन्यांना लाभ घेता येणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर भरण्याची तारीख ३० मार्च ऐवजी ३० पर्यंत वाढवली आहे. कर भरण्यास विलंब झाल्यास दंडाची रक्कम १२ ऐवजी ९ टक्के कमी केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. याव्यतिरिक्त, टीडीएस ठेवींवरील व्याज दर १८ टक्क्यांवरून ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.टीडीएस दाखल करण्याची अंतिम तारीख ३० जून असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.