नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’चा पुनरुच्चार केला होता. दरम्यान, केंद्रात २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए-१ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार) च्या कार्यकाळाच ‘आत्मनिर्भर भारत’ची बीजे रोवली गेली. समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेल्या सुधारणा आज चांगले परिणाम दाखवत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची अधिक माहिती देताना सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेत अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर सुद्धा उपस्थित होते.
विकासाला चालना देण्याबरोबरच स्वावलंबी भारतासाठी २० लाख कोटी रुपयांच ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. सीतारामन यांनी दाक्षिणात्य भारतीयांना ‘आत्मनिर्भर भारत’ हे तामिळ, तेलगू आणि मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये भाषांतरित करुन सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए-१च्या कार्यकाळात’आत्मनिर्भर भारत’ची बीजे रोवली गेली. २०१४ ते २०१९ या कालावधीत मोदी सरकारने सुधारणांचा धडाका लावला असं सीतारामन यांनी सांगितलं.
मोदी सरकारने जनतेच्या समस्या ऐकल्या आणि समस्यांचे निराकरण केले. स्थलांतरित आणि गरिबांचा विचार करता थेट बँक खात्यात अनुदान दिल्याने आजच्या टाळेबंदीमध्ये फायदेशीर ठरली. बँक प्रतिनिधींनी गरिबांच्या घरी जाऊन त्यांना पैसे दिले. डीबीटी, मायक्रो इन्शुरन्स, जनधन, स्वच्छ भारत योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तसेच कृषी क्षेत्रात पीएम किसान योजना , पीएम फसल योजना या निर्णयक ठरल्या. बँकिंग क्षेत्रात स्वच्छ ताळेबंद , इज ऑफ डुईंग बिझनेस, जीएसटी लागू कोळसा क्षेत्रात सुधारणा, मत्स्य व्यवसायात सुधारणा करण्यात आल्या. वीज निर्मितीत भारत स्वावलंबी बनला असल्याचे त्यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”