हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्वयंपूर्णतेचा अर्थ सांगणाऱ्या ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाला 2020 सालचा हिंदी शब्द म्हणून ऑक्सफर्ड हिंदी शब्द असे नाव दिले आहे. भाषातज्ञ कृतिका अग्रवाल, पुनम निगम सहाय आणि एमोजेन फॉक्सल यांच्या सल्लागार समितीने यांनी या शब्दाची निवड केली आहे.
आत्मनिर्भर हा शब्द एखाद्याची निती, मनस्थिती आणि स्वयंपूर्णता ठरवण्यासाठी निवडला गेला होता. या शब्दाचे सांस्कृतिक महत्त्व असणारी टर्म म्हणून दीर्घकालीन महत्त्व असणार आहे. देशाने आत्मनिर्भर होणे म्हणजे आपल्या देशातच कोविडची लस निर्माण करणे व सोबतच इतर क्षेत्रांतही लक्षणीय कामगिरी करणे आहे.
यापूर्वी हिंदीमध्ये ‘आधार’ हा शब्द 2017 साली, ‘नारी शक्ती’ हा शब्द 2018 साली तर ‘संविधान’ हा शब्द 2019 साली यामध्ये जोडला गेला होता. हे शब्द जोडले गेले असले तरी या शब्दांचा ऑक्सफर्ड हिंदी डिक्शनरीमध्ये अजून सहभाग झालेला नाही.