खळबळ : सातारा तालुक्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
498
Satara Taluka Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील एका गावात 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीची पाऊले उचलत तात्काळ एका 20 वर्षाच्या युवकास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचारामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, याबाबत सातारा पोलीसात विनयभंग व पोक्सो अंतर्गर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैदकीय तपासणी नंतर आणखी काही कलमे वाढवावी लागल्यास ती वाढवली जाणार आहेत. दरम्यान, सध्या जखमी अवस्थेतील मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संतापजनक घटनेमुळे संबधित खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला गुन्हा नोंद करण्या अगोदर ताब्यात घेतले आहे. गुरूवारी सकाळी या घटनेची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असून पोलिस कोठडी मागितली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here