भाजप नगरसेविकेसह तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला, नवी मुंबईतील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये भाजप नगरसेविकेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या नगरसेविकेसह तिच्या पतीवरदेखील हल्ला करण्यात आला आहे. हि घटना कौपरखैरणे या ठिकाणी घडली आहे. हा हल्ला भाजप नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आहे.

हा हल्ला कोपरखैरणे सेक्टर 6 मधील भाजपच्या कार्यालयात घुसून करण्यात आला आहे. दोन अज्ञात आरोपी संगिता म्हात्रे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या पतीवरदेखील हल्ला केला. या हल्ल्यात संदीप म्हात्रे यांच्या खांद्यावर कोयत्याने वार करण्यात आले. हा हल्ला होताच दोघांनीही आरडाओरड केली असता आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्यामध्ये लोकांना एका आरोपीला पकडण्यात यश आले आहे. तर दुसरा आरोपी पसार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेले संदीप म्हात्रे यांच्यावर नवी मुंबई पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याचे कारण अजून समजू शकले नाही. कौपरखैरणे पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.