Tuesday, February 7, 2023

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला; पोलीस बंदोबस्तात वाढ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भाषणातून विरोधकांचा खरपूस समाचार घेणारे आक्रमक नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांनंतर हल्लेखोर पसार झाले असून जाधव यांच्या घराच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

अज्ञात व्यक्तींनी भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर दगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या मारल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या हल्ल्याचे नेमकं कारण अजून समजू शकलं नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.या हल्ल्यानंतर स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -

दरम्यान, काल शिवसेना आमदार वैभव नाईक यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीविरोधात ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. यावेळी आपल्या जाहीर भाषणात भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली होती. त्यांनतर काल रात्रीच भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. राजकारणात राजकीय आरोप – प्रत्यारोप होत असतात, एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते मात्र ही राजकीय लढाई थेट घरापर्यंत आली का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला आहे.