धक्कादायक ! विवाहित महिलेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
110
Poision
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धाड : हॅलो महाराष्ट्र – धाड या ठिकाणी एका विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी धाड पाेलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ही घटना १० जुलै राेजी घडली हाेती़. या विवाहित महिलेवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत़.

धाड येथील फौजीया आफरीन म. नसीम या विवाहित महीलेस आरोपी खाजबी म. अलीम, म. अलिम म. अयुब, म. नदीम म. अलिम, सीमा परवीन म. नदीम, शिफा कुदुस खाँ या सासरच्या लोकांनी १० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान विवाहितेस जबरदस्तीने विषारी औषधी पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़

यानंतर या विवाहितेस गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सासरच्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पाचही आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय नीलेश अपसुंदे व कर्मचारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here