स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बिलासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत इस्लामपुरातील वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन पुकारले होते. तासभराच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची वीज पूर्ववत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी माजी खासदार राजु शेट्टी यांचे गेली तेरा दिवस महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या व धरणे आंदोलन करत आहेत. वाळवा तालुक्यातील शेतीचे वीज बील दुरुस्ती केल्याशिवाय बिले भरणार नाही. शेतऱ्यांच्या रोषाला महावितरण जबाबदार राहिल असे त्यांनी यावेळी म्हटले. इस्लामपूर उपविभागाचे उपअभियंता एस. बी. कारंडे यांची गाडी आंदोलनकर्त्यांनी रोखून धरली होती.

महावितरणच्या कार्यालयाला कुलपे लावताना पोलिस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये झटापट झाली. यानंतर महावितरणचे उपअभियंता एस. बी. कारंडे यांनी वीज बिल दुरुस्तीसाठी गाव निहाय मेळावे घेतले जाणार आहेत. यात शेतकऱ्यांनी आपली वीज बिले दुरुस्त करून घ्यावेत असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक थांबले.

Leave a Comment