नवी दिल्ली । जर तुम्हीही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) केली असेल किंवा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी FD शी संबंधित महत्त्वपूर्ण नियमात बदल केला आहे. बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटची मुदत संपुष्टात आल्यानंतर RBI ने विना दावा सांगितलेल्या रकमेवरील व्याजाचे नियम बदलले आहेत. या नव्या नियमानुसार, जर मॅच्युरिटीची तारीख गाठली गेली, जर तिच्या रकमेवर दावा केला गेला नाही, तर त्यावरील व्याज कमी असेल.
RBI ने परिपत्रकात म्हटले आहे की, आता असा निर्णय घ्या आला आहे जर फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युर (FD maturity) झाली आणि रक्कम काढली गेली नाही आणि त्यावर कोणी दावा केला नाही तर त्यावरील व्याज दर बचत खात्यानुसार असेल किंवा कराराचा व्याज दर, जे काही कमी असेल ते फिक्स्ड डिपॉझिटच्या मॅच्युरिटीवर देय असेल.
सर्व बँकांना लागू असलेला नवीन नियम
नवीन नियम सर्व वाणिज्य बँका, लघु वित्त बँक, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील डिपॉझिटसना लागू असेल. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे असे डिपॉझिटस जे काही विशिष्ट मुदतीसाठी बँकांमध्ये ठेवले जाते. यामध्ये आवर्ती, संचयी, पुनर्गुंतवणूक ठेवी आणि रोख प्रमाणपत्रे यासारखे डिपॉझिटस समाविष्ट आहेत.
गुंतवणूकीसाठी FD ला प्राधान्य दिले जाते
अनेक लोकं पैसे अधिक चांगल्या प्रकारे गुंतविण्यासाठी FD (Fixed Deposit) ला पसंत करतात. गुंतवणूकीसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ज्या गुंतवणूकदारांना जोखीम टाळायची असते त्यांच्यासाठी FD एक चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना पैसे जमा करण्यासाठी आणि परतावा मिळविण्यासाठी बरेच चांगले पर्याय आहेत. उच्च व्याजदरामुळे FD मध्ये गुंतवणूक करणे खूपच आकर्षक बनते. यामध्ये सुरक्षित, खात्रीशीर परतावा, गुंतवणूक सुलभ आणि गुंतवणूकीची रक्कम परत मिळविणे देखील सोपे आहे. या FD चा बाजारातील हालचालींवर परिणाम होत नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा