विरोधकांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले? : डॉ. अतुलबाबा भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 

कराड:- कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी जे विरोधक आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले?, असा सवाल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. वारुंजी व पार्ले येथील कृष्णा कारखाना सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, माणिकराव पाटील, प्रफुल्ल पाटील, दादासाहेब मेजर, हरिभाऊ पाटील, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, राहुल पाटील, बाबासाहेब नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभासदांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, की कृष्णा कारखान्याने गेल्या ५ वर्षात ३ हजार रूपयांहून अधिक दर दिला आहे. गेल्या ५ वर्षात साखर उतारा सर्वाधिक राहिला आहे. शेतकऱ्यांच्या बिलातून कोणतीही कपात न करता कारखान्याचा विस्तार केला गेला, ज्यामुळे आज कृष्णा कारखाना ९००० हजार मे. टनापर्यंत गाळप करते. भविष्यात १२ हजार मे. टन गाळप क्षमता करण्याचे नियोजन आहे. मागील संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर उभा केला. त्यांच्या काळात तोडणी वाहतुकीची थकबाकी कोट्यवधी रूपयांची होती, पण डॉ. सुरेशबाबांच्या कार्यकाळात एक रुपयादेखील थकबाकी नाही. ज्यांना केवळ सत्तेसाठी कारखान्याची निवडणूक लढवायची आहे, अशा विरोधी प्रवृत्तींना सभासदांनी थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, तानाजी नलवडे, धोंडीराम निकम, तुकाराम जाधव, संभाजी नलवडे, आनंद नलवडे, भिकाजी पाटील, गोरख नलवडे, महेश पाटील, सयाजी पाटील यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment