मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने या प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

ही घटना दुर्देवी आहे. पण एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे असेही राऊत म्हणाले. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचं कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.

हिरेन यांचा मृत्यू का झाला? कोणत्या कारणाने झाला? त्याला कोण जबाबदार आहेत? या सर्व प्रश्नांशी संबंधित सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी लगेचच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like