औरंगाबाद शहरातील न्यू पहाडसिंगपुरा या जुन्या वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना नळाला येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्याना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वेळा महानगरपालिकेत तक्रार करून देखील अधिकारी दखल घेत नसल्याने नागरिकांनी थेट मनपा आयुक्ता विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात आज तक्रार दिली.
नळाला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे पहाडसिंगपुरा येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. तेथील नागरिकांना अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.सध्या कोरोनाच्या प्रदूरभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे .त्याच बरोबर या दूषित पाण्यामुळे रोगराई वाढेल व नागरिकांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. असे नागरिकांनी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधीला बोलताना सांगितले.
अनेक वेळा मनपा अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील दाखल घेतली गेली नसल्याने त्रस्त होऊन तेथील नागरिकांनी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पाणीपुरवठा अभियंता, उपअभियंता यांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रारअर्ज केला आहे.