सांगली जिल्ह्यात उद्यापासून सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन ः जयंत पाटील

सांगली | महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने काल सोमवारी  ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला होता. मात्र आज मंगळवारी जिल्ह्याचीच कोरोनामुळे परिस्थिती चांगली नसल्याने बुधवार 5 मे ते मंगळवार 11 मेपर्यंत सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

या काळात शहरात दूध, दवाखाने, मेडिकलसह वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद राहणार आहेत. शिवाय किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांना यापुढे केवळ सकाळी सात ते अकरा या वेळेत होम डिलिव्हरी करता येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी काल दिला होता.

सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित वाढले असून शेजारील सातारा जिल्ह्यातही आजपासून कडक लाॅकडाऊन लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनीही सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे.

You might also like