औरंगाबाद – गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख करून देणार्या ‘ग्ली स्टेटी जनरली- इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया’ इटालियन मासिकाने नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या जगातील पाच महत्त्वाच्या शहरात औरंगाबादला स्थान दिले आहे. औरंगाबाद सोबतच चीनमधील बीजिंग-टियांजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेन ही शहरे या यादीत आहेत.
‘इनोव्हॅझिओन’च्या मते ही शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध औद्योगिक प्रभावी आणि सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सर्वात नावीन्यपूर्ण जागतिक उत्पादनाची शहरे आहेत. शहरांमध्ये जागतिक दर्जाची विद्यापीठे आणि संशोधन केद्रांसह आघाडीच्या प्रयोगशाळा आणि कारखाने आहेत. टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, आणि मोठ्या बँका यासारख्या आयसीटी, टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल आणि मेकॅनिकल कंपन्यांचे उत्पादन युनिट म्हणून मुंबई औरंगाबाद चे वर्गीकरण करण्यात आले आहे.
उत्पादन क्षेत्रात औरंगाबाद अव्वल ‘इनोव्हॅझिओन’ या नियतकालिकाच्या अहवालात म्हटले आहे की, औरंगाबाद हे 8 लाख लोकसंख्येचे शहर असून, ऑटोमोटिव, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या उत्पादन क्षेत्रांमध्ये हे शहर पुढे आहे. शहराच्या विस्तीर्ण औद्योगिक वसाहतींमध्ये सिमेंस, बीएमडब्ल्यू, स्कोडा यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्लांट्स आहेत. उद्योगाबरोबरच औरंगाबाद मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, जे संपूर्ण भारतात लोकप्रिय विद्यापीठांपैकी एक आहे. नियतकालिकाने असा अंदाज वर्तविला आहे की, येत्या काही वर्षात याहूनही अधिक वेगाने या शहराची वाढ होईल. विद्यार्थी आणि संशोधक देशभरातून अभ्यास करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी येथे येतात. त्यामुळे शहराच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होईल.