हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना औरंगाबाद पोलिसांची नोटीस बजावली आहे. औरंगाबादमध्ये १ मे रोजी झालेल्या सभेत राज ठाकरे यांच्याकडून काही अटींचा भंग झाला आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून राज ठाकरेंना जिल्हा न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
१ मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरेंची मोठी सभा पार पडली. त्यावेळी काही अटी आणि शर्थी घालूनच राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून काही अटींचे उल्लंघन झाले होते, त्यामुळे राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानुसार, कलम 116,117,153 भादविसह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. आज या प्रकरणी जिल्हा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
दरम्यान, राज ठाकरे हे आज पुण्याच्या दाै-यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज मनसेच्या सदस्य नाेंदणीचा प्रारंभ झाला. त्यावेळी ठाकरे यांनी आगामी काळात सभासदांना त्यांच्या माेबाईलवर पक्षाचे उपक्रम, माझी भाषणं आदी उपलब्ध हाेणार असल्याची माहिती दिली. २ दिवसांपूर्वीची राज ठाकरेंनी मुंबईत पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना चार्ज केलं होत.