औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात ‘हे’ आठ बिग हॉटस्पॉट

Lockdown
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात दीड महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग अतिशय गतीने वाढत आहे. शहरातील सर्वच भागांतून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर निघत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरच कन्टेनमेंट झोन झाल्याचे चित्र आहे. मात्र महापालिकेने स्मार्ट सिटी टीमकडून केलेल्या सर्वेक्षणाअंती शहरात एकूण 26 कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी 8 भाग हे कोरोना संसर्गाचे बिग हॉटस्पॉट घोषित केले आहेत. तर मध्यम प्रकारात 12 आणि मायक्रो कन्टेनमेंट झोनमध्ये 6 भागांचा समावेश आहे.

शहरात आजघडीला कोरोना उद्रेक झाला असून प्रत्येक भागातूनच नव्याने रूग्ण आढळ लागले आहेत. रोजचे हजारपेक्षा अधिक रूग्ण निघत असल्याने आरोग्य विभाग चिंतेत पडला आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा, प्रमुख अधिकार्‍यांची सर्व टीम कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी दिवसरात्र कसरत करत आहे.

या पार्श्वभूमीवरच वाढता संगर्स पाहता शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपलमेंट कॉर्पोरेशन टीमकडून शहरातील कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले होती. एसएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, प्रकल्प सहायक व्यवस्थापक स्नेहा नायर यांच्या टीमने शहरातील 37 आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वर्कर्सकडून टॅकिंग सिस्टीमद्वारे हे सर्वेक्षण पूर्ण केले. मागील वीस दिवसांत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात शहरातील सर्व भागांचा अभ्यासाअंती 26 वसाहती कंन्टेनमेंट झोन अर्थातच हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या आहेत. तीन प्रकारात कंन्टेनमेंट झोनचे वर्गीकरण करून ते जाहीर केले आहेत.

पहिल्या प्रकारात पंधरापेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी सक्रीय रूग्ण आहेत, अशा 6 वसाहती मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. तर ज्या भागात 50 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी सक्रीय रूग्ण आहेत, अशा 12 भागांना मध्यम (मेडियम) कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर 100 पेक्षा अधिक रूग्ण असलेल्या 8 वसाहतींना लार्च कन्टेनमेंट झोन (बिग हॉटस्पॉट) म्हणून रविवारी पालिकेने जाहीर केले.

आता राबवणार प्रभावी उपाययोजना…
आता या वसाहतींत कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणासह आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जाणार असल्याचे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. कन्टेनमेंट झोन ठरवताना त्या त्या भागातील अंतर्गत वसाहतींना बफर झोन निश्चित केले असून त्या वसाहतींवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.