आता नवे वसुली मंत्री कोण? चित्रा वाघ यांचा सवाल

महाविकासआघाडी सरकारवर जोरदार केली टीका.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सचिन वाझेला गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. त्याबाबत अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नाही. या प्रकरणात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरुन आपण राजीनामा देत असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

You might also like