AUS vs WI Test : वेस्ट इंडिजने 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकली; ब्रायन लाराच्या डोळ्यात आनंदाश्रू

AUS vs WI Test Result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

AUS vs WI Test : वेस्ट इंडिजने (West Indies Cricket) मोठा इतिहास रचला आहे. गब्बा येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने ८ धावांनी थरारक विजय मिळवला आहे. पदार्पणाच्या सामन्यात शामर जोसेफने हेझलवुडचा त्रिफळा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. महत्वाचे म्हणजे तब्बल 27 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला आहे. या विजयानंतर वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लाराच्या डोळ्यात कॉमेंट्रीच्या दरम्यान आनंदाश्रू सुद्धा आले.

पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ३११ धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव २८९ वर घोषित झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची फलंदाजी कोसळली आणि अवघ्या १९३ धावातच त्यांचा डाव आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जिकंण्यासाठी 216 धावांचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियन संघाचा सध्याचा फॉर्म बघता हे लक्ष्य आरामात पार होईल असं वाटलं होते. मात्र वेस्ट इंडिजच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 207 धावांत गुंडाळला. AUS vs WI Test

शामर जोसेफ ठरला मन ऑफ द मॅच – AUS vs WI Test

सलामीला आलेल्या स्टीव्ह स्मिथने सार्वधिक नाबाद ९१ धावा केल्या,तो अखेरपर्यंत मैदानात उभा होता त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयाची आशा होती. मात्र वेस्ट इंडिज कडून पहिलीच कसोटी खेळणाऱ्या शामर जोसेफने तब्बल ७ बळी घेत कांगारूंचे कंबरडं मोडलं. अटीतटीच्या क्षणी त्याने जोश हेझलवुडचा त्रिफळा उडवत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ चा किताब देण्यात आला.

तब्बल 27 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामना (AUS vs WI Test ) जिंकला आहे. त्यामुळे या विजयाचे महत्व मोठं आहे. या ऐतिहासिक विजयानंतर माजी दिग्ग्जज फलंदाज ब्रायन लारा आणि कार्ल हुपर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. लाराचे डोळे तर सामन्याची कॉमेंटरी करताच पाण्याने भरले होते तर कार्ल हुपर यांनी सुद्धा ड्रेसिंग रूममधून आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.