हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhanteras 2022 : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. नुकताच दसरा झाल्यामुळे आता दिवाळीच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकांकडून या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. विशेषतः सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी लोकं या सणाची वाट पाहत असतात. बहुतेक लोकं मौल्यवान दागिन्यांसह इतर गोष्टींची खरेदी या काळातच करतात. धनत्रयोदशीपासून सुरू होणारी दिवाळी पुढील पाच दिवस राहते.
मात्र हे लक्षात घ्या कि, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवसाचे खरेदीसाठी विशेष महत्त्व आहे. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेमुळे मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी याच दिवशीचा शुभ मुहूर्त पहिला जातो. Dhanteras 2022
धनलक्ष्मी आणि कुबेर यांची केली जाते पूजा
धनत्रयोदशीला धन आणि सुखसमृद्धीचा सण मानले जाते. या दिवशी लोकांकडून कुबेर आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. हिंदूंसाठी आणि विशेषतः व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी संपत्ती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या जातात. तसेच गुंतवणुकीसाठी देखील या दिवसाला महत्त्व दिले जाते. आता काही दिवसांतच धनत्रयोदशी येणार असल्याने देशभरातील ज्वेलर्सही मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची अपेक्षा बाळगून आहेत. म्हणूनच खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ते अनेक ऑफर्स देत आहेत. Dhanteras 2022
खरेदीसाठी चांगला मुहूर्त
यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी उदयतिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र सोने, चांदी, भांडी, कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीचा मुहूर्त 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे धनत्रयोदशीच्या सणाआधीच खरेदी सुरु करता येईल. Dhanteras 2022
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठीचे शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीच्या सणानिमित्त खरेदीसाठी शुभ मुहूर्त शनिवार, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 5:02 ते 6:27, सायंकाळी 6:02 ते 7:20 आणि रात्री 8:55 ते 1:56 पर्यंत आहे. मध्यरात्री दुसरीकडे, 23 ऑक्टोबर रोजी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त सकाळी 6.27 ते सायंकाळी 6.03 पर्यंत आहे. या दिवसाचे इतर मुहूर्त सकाळी 08:02 ते दुपारी 12:23, दुपारी 1:50 ते दुपारी 3:16 आणि संध्याकाळी 5:44 ते 06:03 पर्यंत आहेत. Dhanteras 2022
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ 6 योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!
Train Cancelled : रेल्वेकडून 159 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या दरात झाला बदल, नवीन दर पहा
‘या’ दिवाळी सेलमध्ये स्वस्त दरात iPhone 13 मिळवण्याची संधी !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल