हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T -20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये होणार असून ही लढत काट्याची होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत शेवटच्या क्षणी सामना जिंकत अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे अद्याप यातील एकही संघाने T20 विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे प्रथमच विश्वचषकावर आपलं नाव करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
न्युझीलंड ने उपांत्य सामन्यात बलाढ्य इंग्लंडचा पराभव करत खळबळ उडवून दिली. न्यूझीलंडचे यश त्यांच्या सांघिक कामगिरीवरच अवलंबून असून आत्तापर्यंत प्रत्येक सामन्यात वेगवेगळे मॅचविनर मिळाले आहेत. कर्णधार केन विलीयम्सन, मार्टिन गुप्तील, डार्लि मिचेल, यांच्यावरच न्यूझीलंड ची फलंदाजी अवलंबून असून गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, ऍडम मिल्ने, यांच्यावर मदार आहे. त्यामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवायच असेल तर न्यूझीलंड ला पुन्हा एकदा आपला सांघिक खेळ दाखवावा लागेल.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ दमदार फॉर्मात आहे. पाकिस्तान विरुद्ध हरलेल्या सामन्यात अखेरच्या क्षणी बाजी मारल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वास नक्कीच वाढला असेल. अरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, असे एकापाठोपाठ एक T20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा भरणा ऑस्ट्रेलियन संघात आहे. तर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, ऍडम झम्प्या असे विकेट टेकर गोलंदाज असल्याने ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडच्या तुलनेत तगडा वाटत आहे.त्यामुळे आजचा मूकाबला रोमांचक होणार यात शंकाच नाही.