नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Gmail चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या हॅकिंगच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे आता गूगल Gmail सुरक्षित करण्यासाठी नवी सुविधा घेऊन येत आहे. जीमेलमध्ये एक प्रमाणित ब्रँड लोगो, एक सुरक्षा सर्विस आहे जी पहिल्यांदा जुलैमध्ये घोषित करण्यात आली होती. हि सर्विस येणाऱ्या आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे. याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. गूगलकडून देण्यात आलेल्या या फीचरमध्ये ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन नावाच्या एका मानकाचा वापर करण्यात आला आहे. जो मेल अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत करणार आहे.
कसं काम करेल ही सर्विस –
एखाद्या संस्थेचा लोगो ईमेल पाठवल्यानंतर युजरच्या इनबॉक्समध्ये दिसणार आहे. हे डोमेन आधारित संदेश प्रमाणीकरण, रिपोर्टिंग आणि DMARC नावाच्या एका तंत्राचा वापर करते. जे फिशिंग मेल कमी करण्यासाठी मदत करते. मिळालेल्या माहितीनुसार, लोगो अशा कंपन्यांसाठी दिसतील जे आपल्या ईमेलला प्रमाणित करण्यासाठी सेंडर पॉलिसी फ्रेमवर्क किंवा डोमेनच्या आयडेंटिफिकेशन मेलचा उपयोग करतात.SPF आणि DKIM हे एक ईमेल प्रमाणीकरण तंत्रज्ञान आहे, ज्याचा उपयोग स्पॅमरला नियंत्रित करण्यासाठी करण्यात येतो. युजर्सकडून त्यांच्या ईमेलला स्कॅम रुपात निश्चित केले गेल्यास या तंत्राचा उपयोग करुन फसवणूक करणाऱ्यांना आळा घालता येणार आहे.
या सर्विसचे फायदे
कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले कि, ज्यावेळी हे प्रमाणित ईमेल सर्व प्रमाणिकता पास करतील, त्यावेळी जीमेल UIM मध्ये असलेल्या स्लॉटमध्ये Logo दिसण्यास सुरुवात होईल. लोगो छोट्या सर्कुलर रुपात स्लॉटमध्ये दिसणार आहे. यामुळे फिशिंग, हॅकिंगसारख्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.