Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Banking Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मे महिन्यात बँका 12 दिवस बंद (Bank Holiday) राहतील. मे महिन्यात कामगार दिन, अक्षय्य तृतीया, ईद, बुद्ध पौर्णिमा, परशुराम जयंती आणि रवींद्रनाथ टागोर जयंती यांसारख्या प्रसंगी बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवार सारख्या आठवड्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लिस्टनुसार या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतील. त्यामुळे … Read more

ईदनंतर लेबर कॉलनीतील घरे होणार जमीनदोस्त

dangerous buildings in Aurangabad

औरंगाबाद – विश्‍वासनगर-लेबर कॉलनीची जागा रिकामी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून तेथील रहिवाशांनी जागेचा ताबा सोडावा, कायद्याचा आदर राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. ताबा न सोडल्यास ईदनंतर ही जागा मोकळी करून घेण्यासाठी कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विश्‍वासनगर-लेबर कॉलनी येथील जागा मोकळी करण्याच्या … Read more

राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी; पोलिसांनी घालून दिल्या 16 अटी

Raj Thackeray

औरंगाबाद- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण 16 अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. राज ठाकरे 29 आणि 30 एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. … Read more

30 वर्षांपासून ‘या’ रेस्टॉरंटमध्ये दिले जात होते टॉयलेटमध्ये बनवलेले समोसे, आता शटर बंद

Samosa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची आवड असते. अशी लोकं सतत काही ना काही कारण काढून बाहेर जेवणाचा बेत आखत असतात. मात्र कोरोनामुळे स्वच्छतेच्या कारणांमुळे अनेक लोकं बाहेरचे अन्न खाण्यात कचरतात. अशातच लॉकडाऊन उघडल्यानंतर खाद्य विक्रेते तसेच हॉटेल्स आणि रेस्टोरंन्टसना स्वच्छतेची जास्त काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सौदी अरेबियातुन … Read more

PM Svanidhi Yojana : आता गॅरेंटी शिवाय मिळेल 50 हजारांपर्यंतचे कर्ज; मुदत 2024 पर्यंत वाढली

PM Svanidhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योनेअंतर्गत अनेक योजना चालवते. त्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या PM स्ट्रीट व्हेंडर आत्मानिर्भर निधी (PM Svanidhi Yojana) ची मुदत आता डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. पी.एम. स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मार्च 2022 पर्यंत होती. मात्र … Read more

औरंगाबादेत सूर्य ओकतोय आग; दोन वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद

summer

औरंगाबाद – सूर्य एप्रिलअखेरीस अक्षरश: आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. शहरात बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील आणि गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. वाढत्या तापमानाने औरंगाबादकरांच्या जिवाची काहिली होत आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या आठवड्यात घसरले होते. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची काहीशी सुटका झाली होती. शहरात रविवारी 37.2 … Read more

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ? आज होणार निर्णय

raj thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पण या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आज या परवानगीबाबत सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. निखिल गुप्ता म्हणाले, “आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आणि … Read more

लाकडाने डोक्यात वार करून सुनेने केला सासूचा खून

औरंगाबाद – नेहमीच वाद होणाऱ्या सुन व सासुच्या झालेल्या भांडणात शेवटी सुनेने घरातील चुली शेजारील जळक्या लाकडाने सासुच्या डोक्यात वार करुन खुन केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पाटेगाव (ता.पैठण) येथे बुधवारी घडली. कौसाबाई अंबादास हरवणे (वय ५५) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुन कांचन गणेश हरवणे व सासू कौसाबाई हरवणे … Read more

संभाजी भिडे यांचा भुवळ आल्याने अपघात; गंभीर जखमी

Sambhaji Bhide

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सायकलवरुन जात असताना भोवळ येऊन भिडे यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये भिडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भिडे गुरुजी हे सांगलीतील गणपती मंदिर मध्ये त्यांच्या सायकलवरून दर्शनासाठी निघाले होते. यावेळी … Read more

गुन्हे शाखेची मोठी कारवाई! हवाला रॅकेटचा पर्दाफाश करत 1 कोटींची रोकड जप्त

औरंगाबाद – तांदळाच्या दुकानातून हवाला रॅकेट चालवणाऱ्या एकाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. शहरातील शहगंजहून चेलीपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुरेश राईस किराणा दुकानात छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी संध्याकाळी गुन्हेशाखेने ही कारवाई करत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या ठिकाणाहून तब्बल 01 कोटी साडेनऊ लाख रुपये जप्त करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील किराणा … Read more