PM Svanidhi Yojana : आता गॅरेंटी शिवाय मिळेल 50 हजारांपर्यंतचे कर्ज; मुदत 2024 पर्यंत वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योनेअंतर्गत अनेक योजना चालवते. त्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या PM स्ट्रीट व्हेंडर आत्मानिर्भर निधी (PM Svanidhi Yojana) ची मुदत आता डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. पी.एम. स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मार्च 2022 पर्यंत होती. मात्र आता याची मुदत वाढवून सदर योजना २०२४ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएम स्वानिधी विषयी जाणून घ्या (PM Svanidhi Yojana) –

कोरोनामध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग ठप्प झाले. विशेषतः ज्यांचे हातावरचे पोट होते त्यांचे खूप नुकसान झाले आहे. यामध्ये रस्त्यांवरील विक्रेते, छोटे व्यावसायिक यांचा समावेश होतो. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी व्याज अनुदानासह 10,000 रुपयांपर्यंतचे लोन दिले जाते. यामध्ये पहिल्यांदा घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यावर, लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज मिळते. तसेच त्यांना दुसऱ्यांदा 20 हजार रुपयांपर्यंतचे आणि तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.

डिजिटल ट्रान्सझॅक्शनना प्रोत्साहन देण्यासाठी अनुक्रमे व्याज सबसिडी (7 टक्के p.a.) आणि कॅशबॅक (रु. 1,200 पर्यंत) स्वरूपात इन्सेन्टिव्ह दिले जात आहे. यामध्ये 24 टक्के वार्षिक दराने 10,000 रुपयांचे कर्ज दिले जाते, मात्र याचे व्याज अनुदान प्रभावीपणे एकूण व्याजाच्या 30 टक्के आहे. या योजनेअंतर्गत, डिजिटल ट्रान्सझॅक्शनना प्रोत्साहन देण्यासाठीच रस्त्यावरील विक्रेत्यांना QR कोड, प्रशिक्षण आणि कॅशबॅकची सुविधा दिली देखील केली जाते.

PM Svanidhi Yojana Online ApplyClick Here (www.hellomaharashtra.in)

अधिक माहितीसाठी पहा : https://hellomaharashtra.in/financial-news/

तुम्हाला हे पण आवडेल –

PM Kusum Yojana: सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे महागड्या डिझेलपासून होईल शेतकऱ्यांची सुटका

PM Kisan Yojana : एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील 2000 रुपये, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Atal Pension Yojana | सरकारने शिथिल केले नियम, आता २.२८ लोकांना मिळेल अधिक फायदा