राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी; पोलिसांनी घालून दिल्या 16 अटी

औरंगाबाद- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण 16 अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.

यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे 29 आणि 30 एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर 30 एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील.