भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनची अपयशी झुंज

penguine

मुंबई | भारतात जन्मलेल्या पेंग्विनच्या पहिल्या पिल्लाचा शुक्रवारी मृत्यू झाला. हे पिल्लू ९ दिवसांचं होतं. राणीच्या बागेत ही घटना घडली असून सध्या या परिसरात शुकशुकाट पसरला आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम यकृतावर झाल्यामुळे ही घटना घडली.

संगीतकार अशोक पत्की यांचा जन्मदिवस

ashok patki

विशेष | अमित येवले

जाहिरातींचे जिंगल सम्राट म्हणून ओळख असलेल्या अशोक पत्की यांचा जन्म २५ ऑगस्ट १९४१ रोजी झाला. मराठी चित्रपटांतील अनेक गाण्यांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं आहे. तुकाराम, आईशप्पथ, भेट, आनंदाचं झाड, शुभमंगल सावधान, मी सिंधुताई सपकाळ, गलगले निघाले, बिनधास्त या चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं आहे. सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सप्तसूर माझे हे त्यांचं आत्मचरित्रही खूप लोकप्रिय आहे.

त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हॅलो महाराष्ट्र परिवाराकडून मनःपूर्वक सदिच्छा

रुपयाची घसरण हा तितका गंभीर मुद्दा नाही – रघुराम राजन

Rajan

नवी दिल्ली | सध्या डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला रुपया अनेक भारतीयांना चिंतेत टाकणारा असला तरी अर्थतज्ञ रघुराम राजन यांना मात्र तसं वाटत नाही. काही काळ ही स्थिती राहिल, परंतु मोदी सरकारने चालू खात्यातील तुटीवर लक्ष दिल्यास या संकटातून भारत लवकर बाहेर पडेल असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला.

आरक्षणाबाबत चर्चासत्र

morcha

पुणे | स्थानिक प्रतिनिधी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम मूक मोर्चा समन्वय समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा,मुस्लिम,धनगर आशा सर्व समाजाच्या बांधवाना या ठिकाणी येण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत, ज्येष्ठ अभ्यासक पी मुजुमदार यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आझम कॅम्पसमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होईल.

जेष्ठ आझाद हिंद सैनिक बाबुमियाँ फरास यांचे निधन

सातारा | विजय मांडके सातारा जिल्ह्यातील जेष्ठ व वयोवृद्ध आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास (९८) यांचे अल्प आजार व वृद्धापकाळाने सातारा येथे खाजगी रूग्णालयात ऊपचार घेताना निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या शनिवार माची पेठेतील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर गेंडामाळ येथील कब्रस्तान … Read more

अभिनेत्री रविना टंडन बनली ‘उद्यान राजदूत’

ravina tandon

मुंबई । अमित येवले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “उद्यान राजदूत अर्थात पार्क ॲम्बॅसिडर” म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन हिने मान्यता दिली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव रवीनाला दिला होता. त्याचा स्वीकार करत स्वीकृतीचे पत्र तिने वनमंत्र्यांना पाठवले आहे. १०३ चौरस किलोमीटरच मुंबईसारख्या महानगरातलं हे सुंदर जंगल, भेट देणाऱ्या पर्यटकाच्या मनावर गारूड … Read more

दिल्ली हे शेतकऱ्यांची थकबाकी ठेवणारं शहर – शरद पवार

sharad pawar

पुणे | महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला माल घेऊन दिल्लीच्या बाजारात येत असतात. व्यवस्थित दर देण्याची सकारात्मक बाजू लक्षात घेतली तरी हे पैसे देण्यासाठी बराच वेळ शेतकऱ्यांना थांबवलं जात. कृषिमंत्री असताना असे अनेक अनुभव आल्यामुळे दिल्ली हे थकबाकीच शहर आहे असं नाईलाजाने म्हणावं लागतय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकबाकीसंदर्भात कायदे कडक करण्याची गरज असल्याच मत ज्येष्ठ नेते शरद … Read more

नौकानयनात भारताचा धमाका, महिला कबड्डीत आज सुवर्णपदकाची आशा

naukanayan

सांघिक सुवर्णपदक तर वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई जकार्ता | येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नौकानयन संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंग, ओम प्रकाश, सुखमीत सिंग यांच्या संघाने ६ तास १७ मिनिटे १३ सेकंद अशी आश्वासक वेळ नोंदवत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. दुष्यंत सिंग चौधरी याने लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तर … Read more

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

vijay chavhan

मुंबई | सुरज शेंडगे अनेक मराठी व हिंदी चित्रपटांत आपल्या हलक्या फुलक्या भूमिकांनी रंग भरणाऱ्या विजय चव्हाण यांच दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. श्वास घेण्यात येत असलेल्या अडचणींमुळे त्यांना बुधवारी मुलुंड येथील फॉरटीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विजय चव्हाण यांनी आजपर्यंत जवळपास ४०० चित्रपटात काम केले असून त्यांची मोरूची मावशी नाटकातील … Read more

जयललिता यांना भारतरत्न देण्याची मागणी

jaylalita

चेन्नई | तामिळनाडूच्या आरक्षण प्रश्नाची उत्तम हाताळणी जयललिता यांनी केली. सामाजिक न्याय मिळवून देण्याबाबत त्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे. तमिळ अस्मिता जपण्याच व येथील लोकांना वैश्विक ओळख निर्माण करुण देण्याचं काम जयललिता यांनी केलं. यामुळेच त्यांना भारतरत्न देण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा असं मत तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री व जयललिता यांचे कट्टर समर्थक ओ पनिरसेलवम यांनी व्यक्त केलं.