हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑटो एक्स्पो 2023 मध्ये (Auto Expo 2023) आपल्याला अनेक दमदार गाड्या पाहायला मिळणार आहेत. भारतातील या मोठ्या ऑटोमोबाईल इव्हेंट मध्ये चीनी ऑटोमेकर कंपनी BYD आपली नवीन इलेक्ट्रिक कार सील सेडान सादर करण्याची शक्यता आहे. या कारमध्ये नेमके काय फीचर्स असतील याबाबत आपण जाणून घेऊया.
वैशिष्ट्ये – (Auto Expo 2023)
BYD सील इलेक्ट्रिक सेडान कार (Auto Expo 2023) आधीच जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या सेडानची लांबी 4.80 मीटर, रुंदी 1.87 मीटर, उंची 1.46 मीटर आणि व्हीलबेस 2.92 मीटर आहे. ही इलेक्ट्रिक कार आकाराने मोठा मोठी असल्याने केबिन स्पेसही मोठा मिळतो.
BYD च्या सेडान कार सील मध्ये फ्लश फिटिंग डोअर हँडल, चार बूमरँग आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आणि मागील बाजूस पूर्ण-रुंदीचा एलईडी लाइट बार मिळेल. याशिवाय गाडीच्या आतील भागात 15.6-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हेड्स-अप डिस्प्ले मिळेल.
700 किलोमीटर रेंज-
BYD सीलमध्ये ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानाचा (Auto Expo 2023) वापर करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक सेडान दोन बॅटरी पॅकसह येते. यापैकी एक 61.4kWh आणि दुसरा 82.5kWh बॅटरी पॅक आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, यातील पहिल्या बॅटरीवर ही कार 550 किमीची रेंज देऊ शकते. तर दुसरी बॅटरी एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक सेडान तब्बल 700 किलोमीटर धावू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते.