Auto Expo 2023 Dates : भारतातील सर्वात मोठा Automobile Event; कधी अन् कुठे? तिकीटही पहा

Auto Expo 2023 Dates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील (Auto Expo 2023 Dates) ऑटोमोबाइल जगतातील सर्वात मोठा इव्हेंट असलेला Auto Expo 2023 यंदा 13 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षी ऑटो एक्स्पो इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे आयोजित केला जाईल. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ही भारतीय ऑटोमोबाईल उत्पादन उद्योगातील सर्वात मोठी संस्था आहे.

Auto Expo 2023 Dates

शेवटचा ऑटो एक्स्पो इव्हेंट हा 2020 साली झाला (Auto Expo 2023 Dates) होता. खरं तर हा इव्हेंट दर 2 वर्षांनी घेतला जातो. मात्र कोरोना महामारीमुळे 2022 ला हा इव्हेंट न होता तो 2023 ला आयोजित करण्यात आलाय. ऑटो एक्स्पो 2023 इव्हेंट इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित केला जाईल. इंडिया एक्सपो मार्ट ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे जेपी गोल्फ कोर्सजवळ आहे. यासोबतच दिल्लीतील प्रगती मैदानावर ऑटो एक्स्पो-कम्पोनंट शोचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑटो एक्स्पोमध्ये, विविध वाहन निर्माते त्यांच्या नवीन कार, मोटरसायकल, स्कूटर, व्यावसायिक वाहने, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान सारख्या अनेक गोष्टी प्रदर्शित करतात.

Auto Expo 2023 Dates

ऑटो एक्स्पो 2023 : तारखा, वेळ आणि तिकिटांची किंमत

ऑटो एक्स्पो 2023 वाहने – 13-18 जानेवारी

ऑटो एक्स्पो 2023 ठिकाण : इंडिया एक्सपो मार्ट, ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश , भारत

ऑटो एक्स्पो कंपोनेंट 2023 – 12-15 जानेवारी प्रगती मैदान, नवी दिल्ली, भारत .

लोकेशन – इंडिया एक्स्पो मार्ट: ग्रेटर नोएडा

तिकिटाची किंमत-

13 जानेवारी 2023 – 750 रुपये – Business Hours

14-15 जानेवारी 2023 – 475 रुपये – सामान्य जनता

16- 18 जानेवारी – 350 रुपये – सामान्य जनता

Auto Expo 2023 Dates

ऑटो एक्स्पो 2023 : सहभागी कार उत्पादक कंपन्या (Auto Expo 2023 Dates)

या वर्षी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये विविध प्रकारच्या कारचे अनावरण आणि लॉन्च केले जातील आणि यामध्ये – मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, किया इंडिया, एमजी मोटर इंडिया (Auto Expo 2023 Dates) आणि रेनॉल्ट इंडिया यांसारख्या कार उत्पादक कंपन्या सहभागी होतील.

या एक्स्पोमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी ब्रँड्स सुद्धा पाहायला मिळू शकतात. यामध्ये BYD India, Tork Motors, Okinawa Autotech, Hero Electric, Log9 Material, ELMoto, Matter Motorworks, CE Info Systems, Sibros Technologies India, Omjay Eeve, Autoline E-Mobility, Hop Electric, Devot Motors, MTA E-Mobility, Greaves यांचा समावेश आहे.

हे पण वाचा :

Range Rover Sport 2023 ची डिलिव्हरी सुरु; पहा फीचर्स आणि किंमत

इथेनॉलवर चालणारी Maruti Suzuki ची पहिली कार लॉंच, जाणून घ्या कसे काम करेल इंजिन?

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुतीचा डबल धमाका; Alto K10 CNG मध्ये लॉन्च

Kawasaki Bike : या बाइकवर मिळत आहे 35 हजाराची सूट; ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत