धावत्या ट्रेनमध्ये चढताना अचानक वृद्ध व्यक्तीचा गेला तोल अन्….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या असाच एक रेल्वे (train) अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला चालती ट्रेन (train) पकडणे अंगलट आली आहे. हि घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे (train) सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाचे प्राण वाचवले आहे.

रेल्वे (train) मंत्रालयाने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना भारतीय रेल्वेने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “बिहारच्या पूर्णियामध्ये एका सतर्क आरपीएफ जवानाने चालत्या ट्रेनमध्ये चढताना अपघात झालेल्या प्रवाशाला वाचवलं. कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा/ उतरण्याचा प्रयत्न करू नका.”असे लिहिले आहे.

भारतीय रेल्वे (train) नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकदा हा प्रयत्न आपल्या अंगलट येतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…