हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एका कंपनीची जोरदार चर्चा सुरु आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. हि कंपनी आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बाबा झाल्यानंतर 12 आठवड्यांची सुट्टी (leave) देणार आहे. आपल्याकडे महिलांना मॅटर्निटी आणि पॅटर्निटी अशा सुट्ट्या (leave) काही तशीच सुट्टी आता पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. वॅक्सिन तयार करणाऱ्या फायझर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे फक्त बायोलॉजिकल वडील नाही तर मूल दत्तक घेतलेल्या पुरुष कर्मचाऱ्याला 12 आठवड्यांची सुट्टी (leave) घेता येणार आहे. नवीन वर्षांच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कर्मचारी केव्हाही 12 आठवड्यांची सुट्टी घेऊ शकतो.जे पालक झाले आणि जे अजून झाले नाही अशा दोघांनाही या सुट्ट्या (leave) घेता येणार आहेत.
ह्या सुट्ट्या (leave) कर्मचाऱ्यांसाठी फ्लेक्जिबल ठेवण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना पालक झाल्याचा आनंद घेता यावा यासाठी हि तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नुकतेच बाबा झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या मुलासोबतचे खास आनंदाचे क्षण जगता येणार आहेत.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती