हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता Axis Bank ने देखील आपल्या एफडी वरील व्याजदरात बदल केला आहे. मात्र हा बदल 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीसाठी करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरपासून हे नवीन व्याजदर लागू होतील. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या एफडीवर 2.50 टक्के ते 5.75 टक्के व्याज देत आहे.
नवीन व्याजदर पहा
आता बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 2.50% 30 दिवस ते 3 महिन्यांच्या FD वर 3% व्याजदर मिळेल. आता ठेवीदारांना 3 महिने ते 6 महिन्यांच्या FD वर 3.50% आणि 6 महिने ते 7 महिन्यांच्या FD वर 4.65% व्याजदर दिला जाईल. त्याच बरोबर Axis Bank 7 महिने ते 8 महिन्यांच्या FD वर 4.40% आणि 8 महिने ते 9 महिन्यांच्या FD वर 4.65% आणि 9 महिने ते 1 वर्षाच्या FD वर 4.75% व्याजदर मिळेल.
इतर कालावधीचे व्याज दर खालीलप्रमाणे
Axis Bank कडून आता 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसांच्या FD वर 5.45% आणि 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 पर्यंतच्या FD वर 5.75% व्याजदर मिळेल. तसेच 1 वर्ष 25 दिवस ते 2 वर्षाच्या FD वर 5.60% आणि 2 वर्ष ते 5 वर्षांच्या FD वर आता 5.70% व्याजदर मिळेल. Axis Bank आता 5 ते 10 वर्षांच्या FD वर 5.75% व्याज देईल. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज दर देखील मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 2.50 ते 6.50 टक्के व्याज मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
Bank FD : 100 वर्षे जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
Post Office च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा दुप्पट पैसे
HDFC Bank कडून ग्राहकांना धक्का !!! होम लोन वरील व्याजदरात केली वाढ
IRCTC : ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना जेवणासहित ‘या’ सुविधा मिळतात मोफत !!!