हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank ने ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेकडून आता आपल्या देशांतर्गत एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. हे लक्षात घ्या कि, नुकतेच RBI ने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. ज्यानंतर रेपो दर 5.90 टक्के झाला आहे. त्यामुळे आता बँकांकडून आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
30 दिवसांच्या FD वर मिळणार 3.25% व्याज
Axis Bank कडून आता 15 महिन्यांच्या FD वर सर्वसामान्यांसाठी 6.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.90 टक्के व्याजदर दिला जाईल. तसेच 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के आणि 30 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के व्याजदर दिला जात आहे.
FD वरील नवीन व्याजदर जाणून घ्या
आता Axis Bank कडून 3 ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. त्याच वेळी, 6 ते 9 महिन्यांच्या FD वर 4.65 टक्के, 9 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी 4.75 टक्के, 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसांच्या एफडीवर 5.45 टक्के आणि 15 महिन्यांच्या एफडीवर 5.60 टक्के व्याज दर मिळेल.
तसेच आता Axis Bank 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 6.15 टक्के तर 2 ते 5 वर्षांच्या FD वर 5.70 टक्के व्याजदर देत आहे. त्याच प्रमाणे पाच ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी सध्या 5.75 टक्के व्याजदर दिला जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एफडीवरील दर
आता Axis Bank कडून 6 महिने ते 10 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.90 टक्के ते 6.50 टक्के पर्यंत व्याज दर देत आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदराचा लाभही दिला जातो आहे. हे लक्षात घ्या कि, Axis Bank 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 6.90% व्याजदर देईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock मध्ये पैसे गुंतववून गुंतवणूकदारांनी कमावला कोट्यावधींचा नफा !!!
Bank Of India ने FD वरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवीन दर
Stock Market : जागतिक बाजार अन् परदेशी गुंतवणूकदारांसह ‘हे’ घटक ठरवणार शेअर बाजाराची दिशा
Gold Price : सोने-चांदी महागले, या आठवड्यात सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
‘या’ Penny Stock ने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 11,000% रिटर्न