हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अॅक्सिस बँकेने मंगळवारी ग्राहकांची सोय लक्षात घेऊन एक नवीन बचत खाते सुरू केले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे खाते असलेल्या ग्राहकाला वर्षाकाठी 20 हजार रुपये रूग्णालयाचे कॅश इन्शुरन्स मिळत आहेत, ज्यामध्ये कोरोना विषाणूमुळे रुग्णालयाचा सर्व खर्च भागविला जातो. कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बँक ही सुविधा देत आहे. हे पहिलेच बचत खाते आहे, ज्यावर कोरोना साठी कवर मिळतो आहे. बँकेने त्याचे नाव ‘लिबर्टी सेव्हिंग्ज अकाउंट’ असे ठेवलेले आहे.
या खात्याचे ‘हे’ वैशिष्ट्य आहे-
या खात्यात ग्राहकाला दरमहा किमान 25 हजार रुपये शिल्लक राखण्याचा किंवा लिबर्टी डेबिट कार्ड किंवा बचत खात्यातून (नेटबँकिंग, अॅक्सिस मोबाइल किंवा यूपीआय मार्गे) दरमहा 25000 रुपये त्याच्या गरजेनुसार खर्च करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
या सुविधा उपलब्ध असतील-
ग्राहकांना प्रत्येक शनिवार व रविवार रोजी लिबर्टी सेव्हिंग खात्यात अन्न, करमणूक, खरेदी आणि प्रवास यावरील खर्चानुसार 5% कॅशबॅक मिळेल. या व्यतिरिक्त, ग्राहकांच्या वाढदिवसाच्या महिन्यात स्वतंत्र ऑफर दिली जाईल. पॅकेजच्या या भागात वर्षाकाठी 15 हजार रुपयांचा लाभही मिळणार आहे. हे फायदे कॅशबॅक, बँकिंग, जेवणाचे आणि तिमाही व्हाउचरच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध असतील. हे प्रोडक्ट भारतातील तरुण ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे.
अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांसाठी दररोज नवीन योजना घेऊन येते. कोरोना साथीच्या काळात लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी बँकेने लोकांना रोजगार देण्यासाठी ‘गिग-ए -ऑपरच्यूनिटीज’ हा उपक्रम सुरू केला आहे. या मॉडेल अंतर्गत कोणताही प्रतिभावान उमेदवार देशातील कोणत्याही भागातील बँकेत काम करु शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.