Ayushman Bharat Yojna : आता मोफत मिळणार आयुष्यमान कार्ड, जाणून घ्या कसा मिळणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे ‘आयुष्यमान कार्ड’ यापुढे मोफत मिळणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. पहिले या कार्डसाठी 30 रुपये द्यावे लागत होते. या कार्डच्या मार्फत आपण आपला इलाज मोफत करू शकता. देशभरामध्ये हे कार्ड कॉमन सर्विस सेंटर वरती ऊपलब्ध केले आहे.

आयुष्यमान भारत योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे म्हटले जाते. या योजनेअंतर्गत दहा कोटी परिवारांना वार्षिक पाच लाख रुपये आरोग्य विमा मिळतो या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबांना कॅन्सरसहित 1300 पेक्षा जास्त आजारांवर मोफत उपचार मिळतात. त्यासोबतच पाच लाख रुपयांपर्यंत मोफत विमा कव्हर दिला जातो. आयुष्यमान कार्ड हे पीएम- जेएवाय हॉस्पिटलमध्येही मिळू शकेल. हे मोफत दिले जाणार आहे. या कर्डमुळे आपले उपचार मोफत होण्यास मदत होणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही ऑनलाइन अर्ज करणार असाल तर या https://mera.pmjay.gov.in/search/login वेबसाईटवर जावे. आपला मोबाईल नंबर तेथे दाखल करावा, त्यासोबतच नंबर ऍड केल्यानंतर ओटीपी जनरेट करावा. मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी आवश्यक ठिकाणी भरावा. त्याच्यानंतर राज्य निवडावे. या नंतर आपले नाव आणि जाती श्रेणी निवडावी. आपल्या सर्व डिटेल इंफॉर्मेशन त्याच्यामध्ये भराव्यात. अशा पद्धतीने आपले नाव या योजनेमध्ये रजिस्टर होऊ शकते. सोबतच आपण आयुष्यमान योजनेचे लाभार्थी आहेत का? याची माहिती घ्यायची असेल तर, 14 555 या नंबरवरती कॉल करावा. आयुष्यमान भारत योजनेचा 24 तासाकरिता हेल्पलाइन नंबर 1800111565 हा आहे. यावरही आपण माहिती मिळवू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment