मुंबई महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत! एसआरए फ्लॅट बळकावल्याच्या अरोपसंदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत!

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए प्रकल्पातील सहा फ्लॅट बळकावल्याच्या संदर्भात आरोप केले गेले आहेत. पेडणेकर यांच्यावरील आरोप हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, दोन आठवड्यामध्ये फ्लॅट बळकावल्याचा आरोपाला त्यांनी उत्तर द्यावे.

गोमाता जनता एससारए प्रकल्पामध्ये लाभार्थी नसताना देखील किशोरी पेडणेकर यांनी सहा फ्लॅट बळकावले. त्यानंतर त्या फ्लॅटच्या पत्त्याचा वापर करून तिथे कंपन्यादेखील स्थापन केल्या. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमधून केले आहेत. उच्च न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेऊन पेडणेकर यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीररीत्या सदर फ्लॅट बळकावले असून, त्या पत्त्यावर कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत कसून चौकशी करण्यात यावी. सोबतच, त्यांनी केलेल्या या भ्रष्टाचाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी विनंती किरीट सोमय्या यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like