व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अन सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकार स्थापन केले

अक्षय कोटजावळे । सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास काही नेते घडवून जातात, त्यातीलच एक नेते सुभाषचंद्र बोस ज्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. त्याचा आपण आज 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. 1938 साली गांधीजींनी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी सुभाष बाबूंची निवड केली आणि याच काळात दुसऱ्या महायुद्धाची चाहूल सुरू झाली. दरम्यान ब्रिटिशांनी आपली सम्पूर्ण ताकद पैसा आणि लक्ष या युद्धावरती केंद्रित केले. म्हणून सुभाष बाबूंना वाटत होते की, ब्रिटिशांच्या अशा बिकट परिस्थितीचा लाभ घेऊन भारतातील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र करावी व त्यांनी या दिशेने प्रयत्न करायला सुरुवातही केली.

मात्र गांधींचा या गोष्टीला प्रखर विरोध होता, या वरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. म्हणून सुभाष बाबूंनी अहिंसक काँग्रेस पासून फारकत घेऊन हिंसक मार्गाने देशाला स्वतंत्र करण्याचा निर्धार केला. ब्रिटिशांचे प्रतिद्वंधी जपान आणि जर्मनी यांचा पाठिंबा मिळविला व ब्रिटिशांना Tit for tat (जशास तसे) प्रतिउत्तर देण्यासाठी आझाद हिंद सैन्य उभारण्यास सुरुवात केली. नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे पाहिले स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केले. त्यामुळे भारतातील ब्रिटिश साम्राज्याला काही प्रमाणात हादरा बसला. ब्रिटिश सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी रासबिहारी बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापती पद नेताजींकडे दिले. या वेळी नेताजींनी नारीशक्तीचे महत्त्व ओळखून 22 ऑक्टोबर 1943 रोजी ‘राणी झाशी रेजिमेंट’ची स्थापना केली.

आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार ही बेटे काबीज करून त्यांना अनुक्रमे शहीद व स्वराज्य नवे दिली आणि माऊडॉक येथे भारतीय तिरंगा फडकविला. अशा प्रकारे इतकी मोठी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या द्रष्टा आणि राष्ट्रवादी नेत्याचे 18 ऑगस्ट 1945 ला अपघाती निधन होऊन देशाला खूप मोठा आघात सहन करावा लागला. अशा या महामानवाला व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.