हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांनी तीन दिवसापूर्वी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर 72 तासांनंतर स्वामी रामदेव यांनी टीका झाल्याबद्दल माफी मागितली आहे. रामदेव बाबा यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईमेल पाठवला आहे.
रामदेव बाबांनी ईमेलमध्ये म्हंटले आहे की, “कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या वक्तव्यामुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी मी नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत विविध धोरणांना मी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे,”
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री जी की पत्नी के सामने स्वामी रामदेव द्वारा महिलाओं पर की गई टिप्पणी अमर्यादित और निंदनीय है। इस बयान से सभी महिलाएँ आहत हुई हैं, बाबा रामदेव जी को इस बयान पर देश से माफ़ी माँगनी चाहिए! pic.twitter.com/1jTvN1SnR7
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) November 26, 2022
रामदेव बाबा काय म्हणाले?
ठाण्यात नुक्ताच एक योगा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी रामदेव बाबा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी रामदेव बाबा म्हणाले, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले होते. या योग कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.