हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर करत भारताचा कर्णधार विराट कोहली याचा एक विक्रम मोडीत काढला आहे. बाबर आझम याने टी-२०आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २ हजार रन करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करत विराट कोहलीला मागे टाकले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मध्ये बाबर आझम याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. बाबर आझमने ५२ इनिंगमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या तर विराट कोहलीला २ हजार धावा करायला ५६ इनिंग खेळाव्या लागल्या होत्या.
बाबर आझमच्या या रेकॉर्डमध्ये १ शतक तर १७ अर्धशतकांचा समावेश आहे. बाबर आझमने झिम्बाब्वेविरुद्धच्या सीरिजमध्ये पहिल्या सामन्यात २,दुसऱ्या सामन्यात ४१ तर तिसऱ्या सामन्यात ५२ रन करून हा विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद १ हजार करण्याचा विक्रम इंग्लंडच्या डेव्हिड मलानच्या नावावर आहे.
डेव्हिड मलानने २४, बाबर आझमने २६ आणि विराट कोहलीने २७ इनिंगमध्ये १ हजार रन पूर्ण केले आहेत. काही दिवसांपूर्वीच बाबरने वनडे क्रमवारीत विराटला मागे टाकत अव्व्ल स्थान मिळवले होते.विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अजून एकही शतक केले नाही आहे. तर बाबर आझमच्या नावावर १ शतक आहे. बाबर आझमीने आपल्या टी-२० करियरमध्ये ५ शतके केली आहेत.