Amravati Lok Sabha 2024 : नवनीत राणांच्या विरोधात थेट बंडखोरी; अडसूळ- बच्चू कडूंची उघड नाराजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती लोकसभा मतदार संघात (Amravati Lok Sabha 2024) भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) याना तिकीट देऊन नवा डाव खेळला आहे. मात्र राणा यांच्या उमेदवारीला अमरावती जिल्ह्यातूनच महायुतीकडून विरोधी दर्शवण्यात आलाय. अमरावतीचे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ,त्यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ आणि प्रहारचे बच्चू कडून यांनी उघडपणे नवनीत राणा यांचा विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी तर जाहीरपणे आम्ही नवनीत राणा याना पाडणारच असं म्हणत खुलं आव्हान दिले आहे. त्यामुळे नवनीत राणा त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

खरं तर २०१९ मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या तिकिटावर उभे असलेल्या आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचा पराभव करत दिल्ली गाठली. मात्र केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच राणांची भाषा बदलली आणि त्या भाजपच्या जवळ जाऊ लागल्या. राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाही नवनीत राणा यांनी उघडपणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत भाजपच्या फायद्याची भूमिका घेतली. याचेच प्रमाणपत्र म्हणून नवनीत राणा याना भाजपने अमरावती लोकसभेसाठी तिकीट दिले. मात्र आता त्यांना होमपीचवर संकटाचा सामना करावा लागणार आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचा राणा यांच्या उमेदवारीला ठाम विरोध असून अभिजीत अडसूळ यांनी अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. अमरावती लोकसभा निवडणुकीतून उमेदवारीचा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेतलं जाईल, असं सांगण्यात आलं. पण तसं घडलं नाही असं म्हणत अडसूळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी तर कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा याना लोकसभेला पडणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. महायुतीमध्ये असलो तरी आम्हीनवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असं म्हणत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी नवनीत राणा यांचे टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच राणा चक्रव्यूहात अडकल्या आहेत असं म्हणावं लागेल.