अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई
आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय आहे. आता मात्र आपण सगळे जण कोरोनाच्या फेज थ्री च्या जवळ पोहोचलो आहोत. त्यामूळे आता पुढील १० दिवस सगळ्यांनी काटेकोर पणे घरातच रहा व कोणत्याही परीस्थीतीमधे घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तू आणायला म्हणुन बाहेर जाल आणि कोरोनाच घरी घेऊन याल. तेव्हा पुढील १० दिवस काळजी घ्या. घरात जे काही असेल त्यावर दिवस काढा असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग आता मोठ्या झपाट्याने पसरत असल्याची बाब तज्ञांकडून समजली आहे. तर येणारे १० दिवस हे अतिशय धोकादायक असून संसर्ग वाढण्यासाठी अनुकूल असल्याचेही तज्ञांचे म्हणणे आहे. तेव्हा आता प्रत्येक नागरीकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही इतर कारणासाठी बाहेर नीघू नका कारण आता प्रत्येक ठीकानी कोरोना चा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामूळे आपण कोणतीही मग ती जिवनावश्यक वस्तू असो की आणखी काही आणण्यासाठी बाहेर पडाल तर कोरोनाच घरामधे घेऊन येणार इतकी भीषन परीस्थीतीमध्ये आपण सद्या येऊन पोहोचलो आहोत. नेमके काय म्हणालेत ना. बच्चू कडू बघूयात
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2283904541917791