बीड प्रतिनिधी । अनवर शेख
महावितरण कडून शेतकर्यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकर्यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेतकर्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आज माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्यांशी चर्चा करून कट केलेली वीज जोडणी करण्यासाठी प्रति पंप तीन हजार रु.भरून घ्या आणि तात्काळ वीज जोडणी करा अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी अभियंता शिवलकर यांच्याशी चर्चा करून तात्काळ तोडगा निघत नसेल तर आपण याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचा पवित्रा माजी मंत्री बदामराव पंडित व उपस्थित शेतकर्यांनी घेतला असून दुपारी १ वाजेपर्यंत यावर कुठलाच तोडगा निघाला नसल्याने हे शेतकरी महावितरणच्या कार्यालयातच ठाण मांडून होते.
यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासह माजी सभापती अभिजित पंडित, पंचायत समिती सदस्य भीष्माचार्य दाभाडे, बापू चव्हाण,सादेख शेख, मुकुंद बाबर, बदाम पौळ, विश्वनाथ सोनवणे, अमोल वाकडे, सुनील वाकडे, कैलास वाकडे, मदन गवारे, विष्णू आंधळे, शेख नवीद, भीमराव कोठेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकर्यांची उपस्थिती होती. दरम्यान सर्व शेतकर्यांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला होता.