Saturday, June 3, 2023

कमी वेळेमध्ये अगदी सहजपणे पेमेंट करणारी UPI पेमेंट सिस्टीम काय आहे आणि कशी काम करते? जाणून घ्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळामध्ये डिजिटल पेमेंटला जास्त महत्त्व प्राप्त झाले. आज-काल कॅश व्यवहार खूप कमी केला आहे. डिजिटल व्यवहारामध्ये कोड स्कॅन करून आणि UPI मार्फत पेमेंट करणे. या दोन पद्धती जास्त सोप्या आणि सुरक्षित आहेत. डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या ॲप मध्ये UPI चा वापर केला जातो. UPI कसे काम करते आणि याचा कसा वापर केला जातो. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर जाणून घेऊ UPI बाबत अधिक माहिती.

UPI म्हणजेच Unified Payments Interface हा डिजिटल पेमेंटचा सोपा मार्ग आहे. UPI हे मोबाईल ॲप मार्फत बँकेच्या अकाउंटसोबत लिंक असते. हा डिजिटल पेमेंटचा सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. यामधून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही समोरच्याला पैसे पाठवू शकता. UPI सिस्टीम ही Immediate Limited Service पर काम करते. ही सर्विस नेट बँकिंगसाठी वापरली जाते. स्मार्टफोनमध्ये आपण UPI पिननंबर जनरेट केल्यानंतर हे एक प्रकारचे अकाउंट होते. यामार्फत आपण बिलाचे ट्रांजेक्शन अथवा पैसे ट्रान्सफर करू शकतो.

प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळे UPI असते. आपल्या स्मार्टफोनमधील प्ले- स्टोअरमध्ये जाऊन, आपल्या बँकेच्या यूपीआय ॲप शोधून ते डाऊनलोड करू शकता. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये साइन- इन करावे लागेल. त्यानंतर, आपल्या बँकेची माहिती त्यामध्ये भरून UPI अकाउंट बनवू शकता. सध्या डिजिटल पेमेंटमध्येही जास्त फ्रॉड होत असल्यामुळे, आपण आपले यूपीआय आयडी पिन आणि इतर गोष्टी संभाळून ठेवा. जेणेकरून भविष्यात आपल्याला नुकसान होणार नाही.