Bajaj Housing Finance IPO : बजाजच्या IPO ने रचला इतिहास; 15000 चे झाले 32000

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO ला (Bajaj Housing Finance IPO) गुंतवणूकदारांचा भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. आज हा आयपीओ शेअर बाजारावर लिस्ट झाला असून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. बजाज हौसिंग फायनान्सचा IPO तब्बल 114 टक्क्यांच्या बम्पर प्रिमियमवर शेअर बाजारावर लिस्ट झाला आहे. या आयपीओ आपल्याला मिळावा यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी अक्षरशः देव पाण्यात टाकले होते. आज या आयपीओने दमदार रिटर्न दिल्याने ज्या गुंतवणूकदारांना हा IPO मिळाला आहे त्यांची चांगलीच चांदी झाली आहे असं म्हणता येईल.

150 रुपयांवर लिस्ट- Bajaj Housing Finance IPO

बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO 70 रुपयांच्या अप्पर प्राइस बँडवर आला. मात्र आज तो 150 रुपयांवर लिस्ट होते. याचा अर्थ IPO गुंतवणूकदारांना 114.29 टक्क्यांचा लिस्टिंग लाभ झाला. अजूनही या आयपीओची घोडदौड सुरूच असून सध्या त्याची किंमत १५७ रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे. अनेक तज्ज्ञ सुद्धा बजाज हाऊसिंगच्या शेअरवर समाधानी आहेत. कंपनीचे बिझनेस मॉडेल अतिशय चांगलं आहे त्यामुळे जरी गुंतवणूकदारांनी त्यांचा स्टॉक न विकता होल्ड वर ठेवला तरी नुकसान होण्याची शक्यता नाही असं बोललं जातंय. तसेच, आगामी ४-५ वर्षे गृहनिर्माण क्षेत्रासाठी सुद्धा अतिशय सकारात्मक असून बजाज हाऊसिंगच्या आयपीओला त्याचा फायदाच होण्याची शक्यता आहे.

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी तीन दिवसांत तब्बल 89 लाखपेक्षा अधिक अर्ज आले होते. कोणत्याही भारतीय आयपीओसाठी आतापर्यंत हे सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. बजाज हाउसिंग फायनान्सने IPO द्वारे 6,560 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. पण, त्याला ३.२४ लाख कोटींची बोली लागली. जेव्हा हा आयपीओ बाजारात आला तेव्हा त्याची प्राईस बँड किंमत 66-70 रुपये प्रतिशेअर निश्चित करण्यात आली होती. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 214 शेअर होते. म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराने कमीत कमी 14980 रुपयांची गुंतवणूक करून हा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) खरेदी केला होता. आज हा आयपीओ १५० रुपये शेअरवर लिस्ट झाल्याने प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना 80 रुपयांची कमाई झाली. म्हणजेच 14980 रुपयांचे 32,100 रुपये झालेत. प्रत्येक लॉटवर गुंतवणूकदारांना तब्बल 17,120 रुपयांची बक्कळ कमाई झाली आहे.