भीषण आगीच्या दुर्घटनेत कराड-मलकापूर येथील बेकरीं जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड ते मलकापूर फाटा कृष्णा रुग्णालयाच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या सबवेवरील बेकऱ्यांना भीषण आग लागण्याची दुर्घटना मंगळवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीच्या दुर्घटनेत 2 ते 3 बेकऱ्या जळून खाक झाल्या शिवाय त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास कराड ते मलकापूर फाटा, कृष्णा रुग्णालयाच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या सबवेवरील तीन ते चार बेकरींना भीषण आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. आग इतरत्र पसरल्याने यामध्ये दोन ते तीन बेकऱ्या जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी दाखल होताच कर्मचाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी बेकरींना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. स्थानिक लोकांनी या आगीतून साहित्य वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भीषण आगीत बेकरींमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते तसेच परिसरातील नागरिकांनी आग पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.