कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड बाजार समिती निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसात सुरु होणार असून त्यासाठी कराड तालुक्यातील नेत्यांची जुळवा जुळव सुरू झाली आहे. अशात माजी सहकारमंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. कराड बाजार समितीच्या निवडणुकीत दक्षिणमधील काही लोकांची मदत घेतल्या शिवाय निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही. आणि या निवडणुका पक्ष विरहित लढव्याव्या लागतील, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
कराड तालुक्यातील खराडे येथे माजीमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी आ. पाटील यांनी महत्वाचे विधान केले. यावेळी आ. पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व बाजार समितीच्या निवडणुका या 30 एप्रिलपर्यंत घ्याव्यात असा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे. बाजार समितीची निवडणूक पाहता आपल्याकडे दोन विधानसभा मतदार संघ आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=1151006132246569&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing
एक कराड उत्तर आणि दुसरा कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ. आणि साहजिकच आपल्याला कराड दक्षिणमधील काही लोकांना सोबत घेऊनच बाजार समितीच्या निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. आणि त्याही लोकांची तशा प्रकारची मानसिकता आहे. या निवडणुका थोड्याशा पक्षविरहित ठेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. कोर्टाने जो निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहार. त्यानुसार आता आपणही विचार करून आपापली मते देणे आवश्यक आहेत, असे सूचक विधान आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.