हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना उमेदवारी योग्य एबी फॉर्म न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. त्यानंतर तांबेनी जाहीर पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंबाबत आरोप केले. तांबेनंतर बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसमधील राजकारणावर उघड भाष्य केले. दरम्यान त्यांनी आज काँग्रेसमधील विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले दरम्यान थोरातांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला. राजीनाम्यामागचे कारण हे काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात हायकमांडकडे नाराजी दर्शवणारं एक पत्रही थोरात यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवले आहे. काँग्रेसचा अंतर्गत कलह, सत्यजित तांबे, सुधीर तांबे यांच्या वादात बाळासाहेब थोरात यांनी मौनाची भूमिका घेतली होती. पक्ष श्रेष्ठींना यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे.