महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या एकमेव खासदाराने घेतली नितिन गडकरी यांची भेट, राजकिय वर्तुळात चर्चांना उधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी नुकतीच भाजपा नेते नितिन गडकरी यांची दिल्ली येथील निवास्थानी भेट घेतली. यावेळी धानोरकर यांनी गडकरिंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धानोरकरांच्या गडकरी भेटीने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चां सुरु झाल्या आहेत.

गुरुवारी सकाळी बाळू धानोरकर यांनी गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी धानोरकरांना महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणुन निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या असल्या तरी सदर भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभ मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडूब खासदार म्हणुन निवडून आले आहेत. महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचे ते एकमेव खासदार ठरले आहेत. अगोदर शिवसेनेचे आमदार असलेल्या धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Leave a Comment