सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
१७ जून रोजी मनपा क्षेत्रातील महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर संगीता खोत यांनी महापालिका शाळांच्या शिक्षकांची बैठक घेतली. या बैठकीस महिला बालकल्याण समिती सभापती मोहना ठाणेदार, प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर संगीता खोत म्हणाल्या की, शाळेच्या कालावधीत वर्गावर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर वर्गात मोबाईल सापडल्यास त्या शिक्षकावर कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर वर्गावर जाण्यापूर्वी शिक्षकांना आपले मोबाईल लॉकरमध्ये जमा करावे लागणार आहेत.
शाळेच्या कालावधीत शिक्षकांचे सर्व लक्ष हे विद्यार्थ्यांवर राहावे आणि शिक्षणाचा दर्जा वाढवा यासाठी सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनी हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर शाळा सुरू असताना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणारे असल्याने शिक्षकांना आता वर्गामध्ये मोबाईल वापरता येणार नाही. यामुळे नेहमी वर्गात मोबाईलचा वापर करणाऱ्या शिक्षकांची पंचायत होणार आहे.